कर्जत नगरपंचायतीसाठी 80.21 टक्के मतदान

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निकालाआधीच विजयी जल्लोष
कर्जत नगरपंचायतीसाठी 80.21 टक्के मतदान

कर्जत |प्रतिनिधी|Karjat

कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी (Karjat Nagar Panchayat Election) आज पार पडलेल्या मतदान (Voting) प्रक्रियेत एकूण 80.21 टक्के मतदान (Voting) झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP Workers) फटाके फोडत विजयी जल्लोष साजरा केला.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे (Karjat Nagar Panchayat Election) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) व भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (BJP Ram Shinde) या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी कर्जतमधील वातावरण ढवळून निघाले होते. मतदानाच्या दिवशी सकाळी आ. रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) व माजी मंत्री प्रा. राम शिंदे (BJP Ram Shinde) या दोघांनीही मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मंगळवारी नगरपंचायतीच्या एकूण 12 जागांसाठी मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 27.79 टक्के मतदान झाले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 46.06 टक्के मतदान झाले. एकूण 80.21 टक्के मतदान झाले.

कर्जत नगरपंचायत सार्वत्रीक निवडणुकीसाठी 12 जागांसाठी 31 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 1, 3, 5 व 7 ची निवडणूक प्रक्रीया स्थगीत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेत पार पडले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सर्वच मतदान केंद्रांवर वॉच होता.

कर्जत नगरपंचायतीसाठी 80.21 टक्के मतदान
अकोले नगरपंचायतीसाठी 80.69 टक्के मतदान
कर्जत नगरपंचायतीसाठी 80.21 टक्के मतदान
पारनेर नगरपंचायत : 13 जागांसाठी झाले ‘एवढे’ टक्के मतदान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com