कर्जत नगरपंचायतवर 'महिलाराज'!

कर्जत नगरपंचायतवर 'महिलाराज'!

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये (Karjat Nagar Panchayat Election) नगराध्यक्षपदी उषा अक्षय राऊत (Mayor Usha Raut) तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले (Deputy Mayor Rohini Ghule) यांची निवड झाली आहे.

कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या उषा अक्षय राऊत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. तर उपनगराध्यक्ष पदासाठी रोहिणी सचिन घुले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरला होता. या दोघींचीही या ठिकाणी बिनविरोध (Unopposed) निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर कर्जतमध्ये सर्व नगरसेवकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे देखील सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com