कर्जत नगरपंचायतीच्या चार जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात

कर्जत नगरपंचायतीच्या चार जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायतच्या (Karjat Nagar Panchayat) चार प्रभागासाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज भरण्यात आली होती छाननीमध्ये यातील तीन अर्ज बाद (Application Reject) झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 10 जानेवारी हा शेवटचा दिवस होता. या दिवशी मुदतीत एकूण 18 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चार जागांसाठी आता 10 उमेदवार रिंगणात आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले (Election Officer Ajit Thorbole) यांनी दिली.

यामध्ये दोन प्रभागांमध्ये दुरंगी तर दोन प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये भाजपचे (BJP) चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Nationalist Congress Party) तीन वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) दोन तर काँग्रेसचा (Congress) एक उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरला आहे. यापूर्वी 13 प्रभागांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यावेळेस झालेले आरोप-प्रत्यारोप उमेदवार माघारी चे नाट्य त्यानंतर राम शिंदे (Ram Shinde) यांचे मौनव्रत, यामुळे ही निवडणूक ही वेगळ्या वळणावर गेली होती. या पार्श्वभूमीवर कर्ज शहरांमध्ये पुन्हा एकदा या चार प्रभागाच्या निमित्ताने निवडणुकीचे राजकारण आरोप-प्रत्यारोप याची रान उठणार आहे

प्रभाग निहाय उमेदवार खालील प्रमाणे -

प्रभाग 1 : ज्योती दादासाहेब शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस), वंदना भाऊसाहेब वाघमारे (भाजप), प्रभाग 3 : संतोष सोपान मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस), रावसाहेब पंढरीनाथ खराडे (भाजप), शांता मुकिंदा समुद्र (वंचित आघाडी), प्रभाग 5 : रोहिणी सचिन घुले (काँग्रेस), सारिका गणेश शिरसागर (भाजप). प्रभाग 7 : सतीश उद्धवराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), दादा साहेब अर्जुन सोनमाळी (भाजप), शिवानंद लक्ष्मण पोटरे (वंचित आघाडी)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com