कर्जत नगरपंचायतीच्या चार जागांसाठी 28 अर्ज

कर्जत नगरपंचायतीच्या चार जागांसाठी 28 अर्ज

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायत चार जांगासाठी तब्बल अठ्ठावीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येथील चार जागा या ओबीसी वर्गासाठी अरिक्षीत होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द करून सर्वसाधारण घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार चार जागांवर मतदान घ्यावे लागत आहे. यात दोन महिला आणि दोन पुरुष असे आरक्षण आहे.

कर्जत नगरपंचायत च्या 13 जागांसाठी यापूर्वीच म्हणजे 22 डिसेंबर या दिवशी मतदान झाले आहे. उर्वरित चार जागांसाठी 18 जानेवारी या दिवशी मतदान होणार आहे. या चार जागांसाठी 3 जानेवारी या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी देखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले असून राज्याचा सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्ष यावेळी देखील दोन जागांवर स्वबळावर निवडणूक लढवत आहे. आज उमेदवारी अर्ज भरताना नगरपंचायत कार्यालयाबाहेर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ने देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com