कर्जतला झेंडूला मातीमोल भाव

कर्जतला झेंडूला मातीमोल भाव

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

झेंडूच्या फुलांचे भाव कोसळल्यामुळे कर्जत तालुक्यात शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली, वाहतूक खर्चही न निघाल्याने अनेकांना फुले रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली.

कर्जत तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली.मात्र प्रति किलो झेंडूची फुले अवघ्या दहा ते पंधरा रुपये या भावाने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. अचानक फुलांचे भाव पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. काही शेतकर्‍यांनी भाव नसल्यामुळे झेंडूची फुले रस्त्यावर टाकून दिली.दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरोघरी, दुकाने, मंदिर याठिकाणी झेंडूच्या फुलांचे हार करून घालण्याची परंपरा आहे. दसर्‍याच्यावेळी झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी आनंदात होते.

मात्र आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूच्या फुलांची आवक झाली. सुरुवातीला 40 रुपये प्रति किलो दर काढण्यात आला मात्र जसजशी आवक वाढत गेली तसा मुलांचा भाव कमी होत गेला अखेर दहा रुपये प्रति किलो या भावाने फुले विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. एवढ्या कमी भावाने फुले विक्री करण्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अनेकांना फुले तोडून बाजारपेठेत आणण्यासाठी जो खर्च झाला तो देखील निघाला नाही अशी माहिती काही शेतकर्‍यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com