उसाचा ट्रेलर अंगावर पडून महिला ठार

उसाचा ट्रेलर अंगावर पडून महिला ठार

कर्जत (प्रतिनिधी)

ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर पलटी होऊन अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना कर्जत तालुक्यातील खेडनजीकच्या पुलालगत घडली आहे.

उसाचा ट्रेलर अंगावर पडून महिला ठार
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

शिला आजिनाथ चव्हाण (रा. खेड, ता. कर्जत) असे या अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमा नदीच्या पुलालगत हा अपघात झाला आहे. पुलानजीक मासे विक्री करणारी दुकाने आहेत.

उसाचा ट्रेलर अंगावर पडून महिला ठार
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

या ठिकाणी शिला चव्हाण या रस्त्यालगत मासे विक्री करत बसल्या होत्या. रसत्याने जाणारा ट्रक्टरचा एक ट्रेलर अचानक कोसळला. इतर नागरीक बाजुला पळाले मात्र शीला चव्हाण यांना हालचाल करण्यास वेळ मिळालाच नाही. त्या ट्रेलर उसाखाली दबल्या गेल्या.

उसाचा ट्रेलर अंगावर पडून महिला ठार
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

काही वेळानंतर ट्रेलर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने भिगवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तत्पुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

उसाचा ट्रेलर अंगावर पडून महिला ठार
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com