कर्जत-जामखेडच्या वन विभागातील प्रलंबीत कामांना मिळणार गती

आ. पवार यांची वनमंत्र्यांशी चर्चा
आ . रोहित पवार
आ . रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

वन विभागाच्या अडचणीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मागणीनुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीला आमदार रोहित पवार यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या कर्जत आणि अरणगाव (जामखेड) येथे जैवविविधता उद्यान, बिबट संगोपन केंद्राची स्थापन अशी वनविभागाशी संबंधित अनेक कामे प्रलंबित आहेत. शिवाय कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी ते चखालेवाडी गट नं. 60 मधून जाणारा रस्ता, अळसुंदे ते देमनवाडी गट नं. 478 व 493 मधून जाणारा रस्ता, नांदगाव ते राक्षसवाडी रस्ता तसेच जामखेड तालुक्यातील देवदैठण व साकत या गावांना जोडणारा रस्ता ही रस्त्यांची कामेही अडकली आहेत.

यामुळे स्थानिक लोकांची गैरसोय होतेच पण विकासालाही ब्रेक लागतो. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी केंद्रीय वनमंत्री, वन विभागाचे सचिव, मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अनेकदा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. त्यानुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली.

यावेळी वन विभागामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील अडकलेल्या विकास कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली. तसेच कर्जतच्या जैवविविधता उद्यानाचे सुमारे पन्नास टक्के काम झाले असून पुढील निधी सरकारने स्थगित केल्याने हे काम थांबले आहे. ते पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी देण्याची मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी बैठकीत केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com