कर्जत |वार्ताहर| Karjat

पुणे, मुंबईच्या धर्तीवर आमदार रोहित पवार यांनी कर्जत जवळ गायकरवाडी याठिकाणी अद्ययावत असे 350 बेडचे करोना सेंटर उभारणी सुरू केली आहे.

याची पाहणी त्यांनी बुधवारी केली. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, महिला आघाडी अध्यक्ष डॉ. शबनम इनामदार, युवती अध्यक्ष राजश्री तनपुरे, भास्कर भैलुमे, सचिन सोनमाळी, दीपक यादव, सचिन धांडे, दादा चव्हाण, मनोज गायकवाड, समाधान खामकर उपस्थित होते.

कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना उपचार करता यावेत यासाठी आ. पवार यांनी कर्जत शहराजवळील गायकवाडी या ठिकाणी 350 बेडचे नवीन करोना सेंटर उभे करीत आहे. त्यांनी याठिकाणी भेट देऊन त्याची पाहणी केली. मतदारसंघांमध्ये अकराशे बेड व त्यांच्यासाठी ऑक्सिजन पाणी औषधे राहण्याची व्यवस्था केली आहे.

कर्जत व जामखेड तालुक्यातील करोना रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी उपचारासाठी आवश्यक असणारे औषधे व इतर बाबींचा देखील अधिकार्यांशी चर्चा करून आढावा घेतला. आ. पवार म्हणाले, कर्जतमध्ये कोव्हिड सेंटर आपण सुरू करीत आहोत. करोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे.

आपण मतदारसंघांमध्ये टेस्टिंगचे प्रमाण वाढवले आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढताना दिसून येते. त्यांना अॅडमिट करण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नवीन 350 बेडची व्यवस्था करीत आहोत.