कर्जतच्या जलजीवन मिशनचा मंत्री पाटलांच्या दालनात आढावा

कर्जतच्या जलजीवन मिशनचा मंत्री पाटलांच्या दालनात आढावा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशनच्या आढाव्याबाबत स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीदरम्यान आमदार रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघातील 70 पेक्षा अधिक गावातील योजनांना मंजुरी दिल्याबद्दल स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले. तसेच मतदारसंघातील या योजनेत समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.काही योजना या निकषात बसत नसल्याने त्यात सुधारणा करणे व त्यामध्ये सोलारचा समावेश करणे गरजेचे होते.

याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. महागाईचा परिणाम सध्या सुरू असलेल्या योजनांवर होत असल्याने योजनांचे दरडोई खर्च वाढल्याने सुधारित खर्चाच्या तपशिलासह या योजना मंजुरीसाठी सरकारकडे आणणे व त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देणे आणि जिल्हास्तरावर मंजूर असलेल्या योजनांचा आढावा घेणे व पूर्तता करून लवकरात लवकर योजना सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

Related Stories

No stories found.