
कर्जत |वार्ताहर| Karjat
येथील उपकारागृहामध्ये असलेल्या 49 कैद्यांची करोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये 27 कैदी बाधित असल्याचे आढळून आले,
अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
कर्जत येथील जुन्या पोलीस स्टेशन इमारतीमध्ये उपकारगृह आहे. याठिकाणी चार कैद्यांसाठी कोठडी आहेत. या सर्व कोठडीमध्ये 49 पोलीस कस्टडी व न्यायालयीन कस्टडी मिळालेले कैदी ठेवण्यात आले आहेत.
यामधील काही कैद्यांना काल उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजारी असल्यामुळे तपासणीसाठी नेण्यात आले होते. तिथे उपचार घेऊन काही परत आले परंतु आज काही कैद्यांना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी तशी माहिती पोलीस अधिकारी यांना दिली पोलीस अधिकारी यांनी ही माहिती आरोग्य विभागात कळवली
आरोग्य विभागाने याठिकाणी कैद्यांसाठी खास करोना टेस्ट करण्यासाठी व्यवस्था केली 49 कैद्यांची याठिकाणी चाचणी होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाला असता 27 कैद्यांना करोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले यामुळे आरोग्य विभाग व पोलिस विभागाने प्रशासनामध्ये देखील खळबळ उडाली आहे जे कैदी कधीही बाहेर निघत नाहीत त्यांना करोनाची बाधा कशी झाली हा प्रश्न निर्माण झाला आहे
जिल्हा रुग्णालय कोव्हिड सेंटरमध्ये रवानगी
या सर्व 27 करोना बाधित कैद्यांना विशेष वाहनांमार्फत पोलीस संरक्षणामध्ये शासनाने खास कैद्यांसाठी उभे केलेल्या तात्पुरते उपचार केंद्र नगर याठिकाणी पाठवण्यात आले आहे. त्याठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये या सर्व कैद्यांवर उपचार होणार आहेत अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
नगरपंचायतीने केली फवारणी
कारागृहामध्ये करोना शिरकाव केल्याचे समजताच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली त्याचप्रमाणे त्याठिकाणी तातडीने निर्जंतुकीकरण फवारणी देखील करण्यात आली आहे.