कर्जत येथे जिल्हा सत्र न्यायालय होण्यासाठी प्रयत्न - आ. पवार

आ . रोहित पवार
आ . रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत येथे जिल्हा सत्र न्यायालय होण्यासाठी आगामी काळामध्ये प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी येथे बोलताना केले.

कर्जत येथे वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचा आज कर्जत येथील न्यायालयामध्ये तालुका वकील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र महामुनी हे होते. यावेळी अ‍ॅड. सुरेश शिंदे, ज्ञानदेव काकडे, भाऊसाहेब शिरसागर, शरद रसाळ, संजीवन गायकवाड, सुरज ढेरे, सुरेश पोटरे, ज्येष्ठविधीज्ञ विठ्ठल राव गवारे, एन बी कदम, गोपाळराव कापसे, विलास गुंजाळ यांच्यासह तालुका वकील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडीने वरिष्ठ स्तर न्यायालयाला मान्यता दिली होती. मात्र राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सर्व निर्णय स्थगित करण्यात आले होते. पाठपुरावा केल्यामुळे अखेर यश आले आणि न्यायालयास मान्यता मिळाली आहे. मला फक्त विकासाचे राजकारण करावयाचे आहे. अ‍ॅड. सुरेश शिंदे यांनी या न्यायालयासाठीचा खटाटोप सांगितला. प्रस्ताविक हरिश्चंद्र महामुनी यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com