पोलिसांकडून गांजासह ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

पोलिसांकडून गांजासह ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील डिकसळ शिवारात एका ओमनी गाडीमधील सुमारे पाच किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ओमनीसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एकूण ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व कर्जत पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि. ३० रोजी सायंकाळी बातमीदारामार्फत ओमनी गाडीमध्ये गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र वाघ या यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार रवींद्र वाघ, वैभव सुपेकर, महादेव कोहक, संतोष फुंदे, जितेंद्र सरोदे यांच्या पथकाने कर्जत ते मिरजगाव रस्त्यावर सापळा लावून मिरजगावच्या दिशेने येणारी ओमनी (एम. एच.४२, एएस ५६९५) थांबवून गाडीची झडती घेतली.

त्यामध्ये पोलिसांना एका काळे रंगाच्या पिशवीमध्ये गांजा असलेले पुडे मिळून आले. गाडीमध्ये असलेल्या दोघांना नावे विचारली असता त्यांनी हेमंत किसन टिळेकर (वय : ३६, रा. उरळीकांचन जि. पुणे) व संतोष नथू सावळे ( वय : ३१, रा. तांबे वस्ती उरुळी कांचन जि. पुणे) अशी असल्याचे सांगितले. यावेळी ओमनी वाहनासह गांज्याच्या मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पोलीस पथकाने केली. एकाच दिवशी दि. ३० रोजी दुपारी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी श्रीगोंदा पोलीस पथकासह श्रीगोंदा येथील शेतात छापा टाकला यात सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर चांगला जरब बसल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com