जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २० जणांना अटक

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २० जणांना अटक

कर्जत पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत (Karjat) तालुक्यातील मिरजगाव (Mirajgoan) येथे छापा टाकून पोलिसांनी (Police) जुगार अड्ड्यावर छापा (Raid on a gambling den) टाकून २० जुगारींना अटक केली आहे.

काल (३ जुलै) रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी जुगारींकडून रोख रक्कम व जुगार खेळण्याची साहित्य जप्त केले. जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांची (Karjat Police) ही सर्वात मोठी कारवाई आहे.

मिरजगावच्या शिवारात कडा रोडच्या (Kada Road) बाजुला पत्र्याचे शेडमध्ये आरोपी हे गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून आरोपींकडून ४८०२० रुपये रोख रक्कम व १००० रुपये किंमतीचे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. क्लबचा मालक स्वप्निल संभाजी कु-हाडे याच्यासह २१ आरोपींवर पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिलीप खैरे यांच्या फिर्यादीवरून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, सचिन वारे, गोवर्धन कदम, बबन दहिफळे, ईश्वर माने, गणेश काळाने यांनी केली आहे. पुढील तपास बबन दहिफळे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com