कुळधरणमध्ये मोबाईलचे दुकान फोडले

महागडे मोबाईल लंपास
कुळधरणमध्ये मोबाईलचे दुकान फोडले

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत (Karjat) तालुक्यातील कुळधरण (Kuldharan) येथील मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान (Mobile Shop) चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने फोडले.

कुळधरणमध्ये मोबाईलचे दुकान फोडले
शेतीच्या अर्थकारणाला येणार सुगंध...

शनिवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली आहे. दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील महागडे मोबाईल (Mobile) लंपास केले.

प्रगती मोबाईल शॉपी या दुकानात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी दुकानातील १५ ते ३५ हजार रुपये किमतीचे २८ ते ३० मोबाईल चोरून नेले असल्याची माहिती प्रमोद चव्हाण यांनी दिली. याबाबत कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीही हे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यात चोरट्यांना यश आले नव्हते.

कुळधरणमध्ये मोबाईलचे दुकान फोडले
Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्णांची नोंद

चोऱ्या रोखण्यासाठी कर्जत पोलिसांकडून (Karjat Police) अथक परिश्रम घेतले जात आहेत. रात्र गस्तीबरोबरच ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीरीत्या कार्यान्वित केलेले आहे. मात्र चोरट्यांकडून नवनवीन फंडे वापरून घर तसेच दुकाने फोडली जात आहेत. नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com