ग्रामविकास अधिकार्‍याला कार्यालयात घुसून मारहाण

ग्रामविकास अधिकार्‍याला कार्यालयात घुसून मारहाण

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत (karjat) तालुक्यातील निमगाव डाकु (Nimgoan Daku) येथील ग्रामविकास अधिकारी एम.एस.माने (MS Mane) यांना एकाने दारुच्या नशेत घराचा उतारा मागण्याच्या कारणावरुन कार्यालयात घुसून मारहाण केली. गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

संजय मद्रास काळे असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. त्याने मारहाण केल्यानंतर थोड्याच वेळात त्याचा मुलगा व आई यांनी ग्रामपंचायत कार्यालयात घुसुन माने यांना मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडले व सरकारी दप्तर अस्ताव्यस्त केले. कार्यालयात घुसुन दहशतीचे वातावरण निर्माण करत उपस्थित ग्रामस्थांनाही शिविगाळ केली.

आरोपीने कार्यालयातील फर्निचर अस्ताव्यस्त फेकून देत धिंगाणा घातला. मारहाण, शासकीय कामात अडथळा या प्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com