
कर्जत | प्रतिनिधी
कर्जत (Karjat) तालुक्यातील पाटेवाडी (Patewadi) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी मोहन जोशी निंबाळकर (रा. पाटेवाडी) याला कर्जत पोलिसांनी (Karjat Police) अटक केली आहे.
पीडितेच्या आईने कर्जत पोलीस स्टेशनला (Karjat Police Station) फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटले की, अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी गेली असता पाचशे रुपये देऊन पीडितेला त्याचे घरात घेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला काही पैसे दिले. घडलेली घटना तुझ्या आईबापाला सांगितली तर तुला जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी दिली होती.
काल पुन्हा असा प्रकार करण्याचा आरोपी प्रयत्न करत असताना पीडित मुलीच्या बहिणीने हा प्रकार पाहिला व तिने आई वडिलांना हा प्रकार कळविला. तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, ईश्वर माने, संतोष फुंदे, गोरख जाधव, जयश्री गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक केली.