दूध संघाला सव्वा कोटींचा चुना लावणारा जोशी जेरबंद

पुणे विमानतळीवर कर्जत पोलीसांची कामगिरी
दूध संघाला सव्वा कोटींचा चुना लावणारा जोशी जेरबंद

कर्जत (प्रतिनिधी)

तालुका सहकारी दूध संघ, याचप्रमाणे तालुक्यातील अनेक खाजगी दूध संस्थांना व राज्यातील अनेक दूध संस्थांना जवळपास आठ ते नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील पाटस येथील महेश लक्ष्मण जोशी यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत घडलेली घटना अशी, महेश जोशी हा एलव्ही डेअरी या नावाने दूध व्यवसाय करत होता. त्याने दूधाच्या थकीत रक्कमपोटी कर्जत तालुका दूध सहकारी संघाला 2020 मध्ये एक कोटी 20 लाख रुपयांचा धनादेश दिला होता. दूध संघाने हा धनादेश बँकेमध्ये भरला, मात्र तो वटला नाही. यामुळे कर्जत दिवाणी न्यायालयामध्ये दूध संघाने जोशी याच्यावर 2022 साली खटला दाखल केला.

तालुक्यातील अनेक सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांची जोशी याने पैसे बुडवले असून जवळपास आठ ते नऊ कोटी रुपयाची तालुक्यातील दूध संस्था यांची फसवणूक केली आहे. आरोपी अत्यंत हुशार व लोकांना फसवण्यात तरबेज आहे. जोशी हा गेले अनेक दिवसांपासून देशाच्या बाहेर राहून व्यवहार करत होता. जोशी भारतात रेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे विमानतळावर त्याला पोलीसांनी अटक केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com