कर्जतमध्ये काळ्या बाजारात रेशनचा तांदूळ

पोलिसांची कारवाई : पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्जतमध्ये काळ्या बाजारात रेशनचा तांदूळ

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

रेशन दुकानातील (Ration shop) तांदूळ (Rise) खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीस (Accused) कर्जत पोलिसांनी जेरबंद (Karjat Police Arrested) केले असल्याची घटना घडली आहे.

अमोल जयसिंगकर (रा.देशमुखवाडी ता.कर्जत) असे अटक केलेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. याबाबत कर्जत पोलिसांनी (Karjat Police) दिलेली माहिती अशी, 19 तारखेला राशीन-करमाळा रस्त्यावर (Rashin-Karmala Road) कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर (Sub-District Hospital, Karjat) सायंकाळी पाचच्या सुमारास बोलेरो कंपनीची (एम.एच.42 ए.क्यू. 6157) ही पिक-अप पोलिसांना संशयित आढळून आली. पोलिसांना (Police) या वाहनात प्रत्येकी 50 किलो वजनाच्या व 10 हजार किमतीच्या सुमारे 10 गोण्या हाती लागल्या आहेत.

पोलिसांनी संबंधित तांदूळ व 5 लाख रुपये किमतीची बोलेरो पिक-अप जप्त केली आहे. हवालदार शाहूराजे टिकते यांनी याबाबत फिर्याद दिली असून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com