कर्जत हल्ला प्रकरणी सहा संशयितांना अटक

गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त
कर्जत हल्ला प्रकरणी सहा संशयितांना अटक

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत येथील सनी पवार या युवकास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी पोलीसांनी सहा संशयितांना जेरबंद केले आहे. तसेच या गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन जप्त केले आहे.

सोहेल शौकत पठाण, अरबाज कासम पठाण दोघे (रा. लोहार गल्ली, कर्जत) जुनेद जावेद पठाण आणि एक अल्पवयीन दोघे राहणार (लोहार गल्ली, कर्जत) यांना कर्जत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित अमरजित मोरे, अनंत सालगुडे, भगवान शिरसाठ पोलीस जवान संभाजी वाबळे, भाऊसाहेब काळे, शाहूराजे टिकते यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना मदत करणारे हुसेन कासम शेख ( रा. पिंपळे गुरव, पुणे), अरबाज अजित शेख (रा.पारगाव, ता. दौंड जि. पुणे) यांना स्थानिक स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, सागर ससाने, जालिंदर माने, बबन बेरड यांनी चिंचवड पुणे येथून मोठ्या शिताफीने मध्यरात्री ताब्यात घेतले.

सदर गुन्ह्या करून पळून जाण्यासाठी वापरलेली ईरटीगा गाडी (क्र. एमएच 16 एटी 4278) जप्त करण्यात आलेली आहे. या करणातील संशयितांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केलेली असून इतर फरार संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान काल अटक करण्यात आलेल्या शौकत पठाण, अरबाज कासम पठाण दोघे (रा. लोहार गल्ली, कर्जत) यांना न्यायालयाने 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com