कर्जत कृषी कार्यालयात शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कर्जत कृषी कार्यालयात शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यात शेततळे योनेत गैरप्रकार झाला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करूनही काही होत नसल्याने एका शेतकर्‍याने कृषी कार्यालय मध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळाला.

रूपचंद गोविंद गांगर्डे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांनी कर्जत तालुक्यातील मुळेवाडी व खांडवी येथे शेततळ्याच्या कामामध्ये अस्तरीकरणांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात कृषी विभागाची अधिकारी सहभागी आहेत असे आरोप केले होते. त्यांची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी आज कृषी कार्यालयाच्या मध्ये येऊन अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्या ठिकाणी असणारे पोलीस कर्मचारी श्री काकडे व श्री सुपेकर यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के व आंदोलन रूपचंद गांगर्डे व इतर शेतकर्‍यांचा समन्वय घडवून आणून चर्चा केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभसके यांनी चार दिवसात संबंधितांवर कारवाई करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा प्रसंग पूर्णपणे टाळला. यावेळी माजी सरपंच सिताराम गांगर्डे, नितीन गांगर्डे, बबन गांगर्डे, निलेश गांगर्डे, काळू गांगर्डे, दीपक साळुंखे, प्रवीण तापकीर, संदीप तापकीर, बंडू तापकीर, प्रताप गांगर्डे, योगेश देवकर, दीपक सूर्यवंशी दत्ता काळे यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

आंदोलन रूपचंद गांगर्डे यांनी यावेळी आपण या प्रश्नावर गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने लेखी पत्र व्यवहार केलेला आहे. त्याच प्रमाणे याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी येऊन पाहणी देखील केलेली आहे. लोकांचे व शेतकर्‍यांचे जबाब झालेले आहेत. तरीदेखील संबंधितांवर कारवाई का होत नाही? अशी विचारणा यावेळी अधिकार्‍यांना केली. यावर चौकशी समिती नेमली आहे अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यानुसार कारवाई होईल असे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com