कर्जत : करोना नियम मोडणार्‍या दुकानांवर कारवाई

कर्जत : करोना नियम मोडणार्‍या दुकानांवर कारवाई

कर्जत (प्रतिनिधी) / Karjat - कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय नियमांचे पालन न करणार्‍या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. मिरजगाव, राशीन, माहिजळगाव या ठिकाणी करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती, दुकाने आदींवर पथकाकडून कारवाई करण्यात आली.

सकाळी 7 ते 4 असा आस्थापना सुरू ठेवण्याचा कालावधी असताना या निर्बंधांचे पालन न करणार्‍या व सायंकाळी 4 नंतरही आस्थापना सुरू ठेवणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली. राशीनसाठी उपविभागीय अधिकारी, कर्जतचे विस्ताराधिकारी, तलाठी, राशीन बिटचे पोलीस कर्मचारी यांचे पथक, मिरजगाव व माहिजळगाव यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी तर कर्जत शहरासाठी मुख्याधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे पथक गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या 3 पथकांना वेळेचे पालन न करणार्‍या आस्थापनांवर कारवाई करण्याचे सूचित केले होते. भरारी पथकांनी दुपारी 4 नंतर राशीन, मिरजगाव, माहिजळगाव, कर्जत शहर या ठिकाणी अचानक भेटी दिल्या. त्यात त्यांना बारा आस्थापना या 4 वाजेनंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आले. यात संबंधीत आस्थापना सीलबंद करण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com