कारेगावात बंद व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सार्वमत

कारेगावात बंद व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बंदबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचे एकमत नाहीच

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrigonda

कारेगावात आज एकाच ठिकाणी सात करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाच्या सर्वच अधिकार्‍यांनी गावात भेट दिली. गाव बंद करण्याची हाक गावातील अनेक पदाधिकार्‍यांनी दिली. मात्र यावेळी गावातील चौकात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जमून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत बेजबाबदारपणाचे वर्तन केले.

यावेळी उपस्थित राजकीय पक्ष नेत्यांनी भाषण करण्याचीही संधी सोडली नाही. आरोग्य खात्याचे महिला कर्मचारी जया रावनवेली यांच्यासह आशा सेविका यांनी कोव्हिड 19 बाबत कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती दिली. कोणत्याही राजकीय पक्षाचे बंदबाबत एकमत होत नसताना दोन माजी सरपंच नातेवाईकांची खडाजंगी जुंपली.

हा सर्व प्रकार तालुका पोलीस निरीक्षक खान यांच्या उपस्थितीत पार पडला. सरपंच पती राजेंद्र उंडे गर्दीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होते. कोणी कुणाचे ऐकत नव्हते. यावेळी माजी सभापती दीपकराव पटारे यांनी माईकचा ताबा घेत सर्व गावकर्‍यांचे मत आवाजी मताने घेऊन कारेगाव व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन पटारे यांनी स्वयंस्फूर्तिने सर्व व्यावसायिक तीन दिवस बंद पाळतील, असे सांगितले आणि गावात भरलेला माणसांचा बैलपोळा अखेर संपला. यावेळी जबाबदार अधिकार्‍यांपैकी फक्त पोलीस पाटील हजर होते. ग्रामसेवक तलाठी परंपरेप्रमाणे गैरहजर होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com