करिना कपूरच्या प्रेग्नेंसी बायबल पुस्तकाच्या शिर्षकातील बायबल शब्द वगळा

अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेची मागणी
करिना कपूरच्या प्रेग्नेंसी बायबल पुस्तकाच्या शिर्षकातील बायबल शब्द वगळा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / shrirampur - सिने अभिनेत्री करिना कपूर व त्यांच्या सहकारी लेखिका आदिती शहा यांनी प्रकाशित केलेल्या करिना कपूरच्या प्रेग्नेंसी बायबल या पुस्तकाचे शिर्षकासाठी वापर करण्यात आलेला बायबल हा शब्द त्वरित वगळण्यात यावा, अशी मागणी श्रीरामपूर शहर व तालक्यातील ख्रिश्‍चन बांधवाच्यावतीने श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांचेकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

या घटनेमुळे ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असुन ख्रिश्‍चन धर्मियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील धर्मगुरूंच्यावतीने फा. ज्यो गायकवाड, पास्टर फेलोशिपचे रेव्ह. आण्णा अमोलिक, रेव्ह. पीटर बनकर, ले लिडर राजेश्‍वर पारखे, ले लिडर विनित चांदेकर, लोयोला चर्च महिला मंडळाच्या अध्यक्षा सोै. रत्नमाला शिणगारे, सेंट बॉप्टिस्ट चर्च गोंधवणीच्या अध्यक्षा सोै. मंगलताई तोरणे, महाराष्ट्र अल्पसंख्यक ख्रिस्ती परिषदेचे मार्गदर्शक सुभाष तोरणे, महाराष्ट्र अल्पसंख्यक ख्रिस्ती परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम, परिषदेचे समन्वयक अविनाश काळे, प्रा. प्रताप देवरे, सुरेश ठुबे, सेक्रेटरी रॉकी राठोड, राजु चक्रनारायण, अशोक साळवे, भाऊसाहेब तोरणे, विलास पठारे, प्रा. विजय बोर्डे विशाल साळवे, प्रकाश निकाळे, राजेंद्र गायकवाड यावेळी हजर होते.

निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अल्पसंख्यक मंत्री नबाब मलिक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com