करंजी घाट रस्ता लूट पोलिसांसमोर मोठे आव्हान

करंजी घाट रस्ता लूट पोलिसांसमोर मोठे आव्हान

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी प्रवाशांना मोटारसायकल अथवा चारचाकी वाहने आडवी लावून त्यांना लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे ही रस्ता लूट करणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पाथर्डी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

या घटनांमधील अद्याप एकाही संशयितास पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून रस्ता लूट करणारे आरोपी कोण याचा शोध लावणे महत्त्वाचे ठरणार आहे. करंजी घाटात रात्री-अपरात्री रस्ता लुटीचे प्रकार होत असल्याने या घटनांमुळे करंजी घाटाची देखील बदनामी होत आहे. मागील 2 महिन्यांपूर्वी मराठवाडी येथील एका ट्रक चालकास बेदम मारहाण करून त्याला लुटण्यात आले होते. त्या अगोदर त्रिभुवनवाडी येथे ट्रक दुरुस्तीसाठी नगरहून आलेल्या या एका फिटरला देखील लुटण्यात आले.

त्यानंतर आठ दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी पाथर्डीकडे मोटरसायकलवरून जात असलेल्या दोघा जणांना घाटात चारचाकी गाडी आडवी लावून त्यांच्याकडील सुमारे साडेसात लाख रुपये हिसकावून घेत त्यांनाही लुटण्याचा प्रकार घडला. करंजी घाटात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लुटमारीच्या घटना घडत असून या घटनेतील मुख्य आरोपीपर्यंत अद्यापही पोलिसांचे हात पोहोचलेले नाहीत. त्यामुळे नगर-पाथर्डी मार्गे ये-जा करणार्‍या प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण आहे. अनेक प्रवाशांनी रात्रीच्यावेळी करंजी घाटातून प्रवास नकोच अशी देखील मानसिकता केलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com