विषबाधा प्रकरणी दुकानाचा परवाना रद्द

करंजीत अन्न, औषध प्रशासनाची कारवाई
विषबाधा प्रकरणी दुकानाचा परवाना रद्द

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील विषबाधा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने सबंधीत दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले आहे.

निलेश सुभाष साखरे यांच्या हरी ओम किराणा स्टोअर या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या दुकानातून नवरात्रीच्या उपवासा निमित्त नागरीकांनी भगरीचे पीठ विकत नेले होते. याच्या भाखरी खाल्यानंतर 15 जणांना विषबाधा होऊन जुलाब, उलट्याचा त्रास झाला होता. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी रात्री या दुकानाची पाहणी केली.

चौकशीत साखरे यांनी अहमदनगर येथून 30 किलोचे नऊ कट्टे खरेदी करून त्याची विक्री 20 सप्टेंबरपासून किरकोळ स्वरूपात सुरू केली व काही भगरीचे घरीच पीठ तयार करून त्याची विक्री सुरू केली. त्यांनी घरीच तयार केलेल्या भगरीच्या पिठामुळे नागरीेकांना उलटी. मळमळ असा त्रास झाल्याचे निषपन्न झाले. यामुळे निलेश साखरे यांच्या दुकानाचा परवाना पुढील आदेश मिळेपर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्र. बा. कुटे, रा. ना. बडे, उ.रा. सूर्यवंशी यांनी सहाय्यक आयुक्त सं.पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

भगरीचा नंतरच वापर करा

भगर पिठापासून कोणतेही पदार्थ तयार करू नयेत. भगर प्रथम भाजून घ्यावी व नंतर त्याचे पीठ तयार करावे त्यानंतर या पिठाचा पदार्थ करण्यासाठी वापर करावा असे आवाहन अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com