
करंजी |वार्ताहार| Karanji
पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील करंजी घाट (Karanji Ghat) सुरु होताच घाटाच्या दुसर्या वळणाच्या संरक्षण कठड्याला लागुन पुर्ण जळालेल्या अवस्थेत मृतदेह (Dead Body) बुधवारी दुपारी पोलिसांना (Police) आढळून आला. यापूर्वीही असे अनेक मृतदेह करंजीच्या घाटात आढळुन आले आहेत. त्यामुळे करंजीघाट (Karanji Ghat) प्रेताची विल्हेवाट लावण्याची जागा अशीच परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाली आहे.
नगर-पाथर्डी महामार्गावर (Nagar Pathardi Highway) करंजीचा अवघड घाट लागतो. नगरकडून येतांना घाट सुरु झाल्यानंतर दुसर्याच वळणाच्या पारपिटाच्या आडोशाला एका अज्ञात इसमाच्या शरिराचे पुर्ण जळालेल्या अवस्थेत काही अवशेष आढळुन आले. डोक्याची कवटी तसेच शरिराचे काही हाडे तेवढी शिल्लक होती. अतिशय मोजकेच अवशेष राहिल्याने हा मृतदेह पुरुषाचा की महिलेचा याचा अंदाज लावणे देखील पोलिसांच्या दृष्टीने कठीण झाले आहे.
मृतदेह पुर्ण जाळुन टाकल्याने आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर मृतदेह हा स्त्रीचा आहे कि पुरूषाचा याचा शोध घेत आहे. या घाटाच्यावर हनुमान मंदिरानजिक मराठवाड्याची हद्द लागते. तर दुसर्या बाजुने नगरची हद्द सुरु होते. या हद्दीचा फायदा गुन्हेगार घेतात. गेल्या काही दिवसांपासुन या घाटात मृतदेह सापडण्याची जणु मालिकाच सुरु झाली आहे.
पोलीस उपाधिक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिभाऊ दळवी, पोलीस कॉन्स्टेबल सतिष खोमणे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल त्रिकोणे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश म्हस्के यांनी घटनास्थळी येऊन या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.