मुलगा-पत्नीच्या निधनाची बातमी कळताच पित्याने सोडले प्राण!

करोनाचा दणका : करंजी गावावर शोककळा
मुलगा-पत्नीच्या निधनाची बातमी कळताच पित्याने सोडले प्राण!

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील सुशिक्षित कुटुंब म्हणून ओळख असलेल्या कुटुंबियातील आई, वडील व मुलगा हे तिघे नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार घेत होते. या तिघांपैकी आई व मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची वार्ता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पित्याला समजताच त्यांनीही देखील रुग्णालयातच प्राण सोडले. या दुर्दैवी घटनेमुळे पाथर्डी तालुक्यातील करंजी गावावर शोककळा पसरली आहे.

जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन भेटत नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येत आहे, तर दुसरीकडे ज्यांना उपचार मिळत आहेत. मात्र, शरीर उपचाराला साथ देत नसल्याने काहींना जीव गमवावा लागत आहे. करंजी येथील सुशिक्षित कुटूंब म्हणुन ओळख असलेल्या ढमाळ कुटूंबावर अशीच परिस्थिती ओढवली आहे. कुटुंबातील तीन व्यक्तींना दहा दिवसाच्या फारकाने मृत्यूने कवटाळल्याने ढमाळ कुटुंबासह संपूर्ण करंजी गाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजाबाई संपत ढमाळ (वय 60) पती सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संपत मारुती ढमाळ (वय 65) व एकुलता मुलगा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शैलेष संपत ढमाळ (वय 42) हे तिघेही नगर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये करोनाशी झुंज देत होते. या तिघांपैकी जिजाबाई ढमाळ यांची तब्येत खालावली म्हणून सुरुवातीला त्यांना मृत्यूने कवटाळले. त्यानंतर मुलगा शैलेष यांनी देखील उपचाराला साथ न दिल्याने त्यांचाही दहा दिवसांच्या फरकाने मृत्यू झाला. ही माहिती उपचार घेणारे संपतराव ढमाळ यांना समजली.

पत्नी व मुलगा या जगात नसल्याचे समजताच त्यांनी देखील दवाखान्यांतच प्राण सोडले. करंजी गावातील एक सुशिक्षित सर्वांशी सहकार्य आणि आपुलकीने वागणार्‍या या ढमाळ कुटुंबातील तीन व्यक्तींचा दहा दिवसांच्या फरकाने करोनामुळे मृत्यू झाला. करंजी गावाच्या इतिहासात पहिल्यांदा ऐवढी मोठी दुर्दैवी घटना करोनामुळे घडलेली आहे. आदर्श शिक्षक शैलेष ढमाळ यांच्या पश्चात लहान दोन मुले, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजाबाई संपत ढमाळ, पती सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संपत मारुती ढमाळ, व एकुलता मुलगा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शैलेष संपत ढमाळ यांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com