करंजी घाटात ट्रक उलटला

सुदैवाने जीवित हानी नाही
करंजी घाटात ट्रक उलटला

करंजी |वार्ताहर| Karanji

नगर पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटात समोरून येणार्‍या वाहनाने एका ट्रकला हूल दिल्याने घाटातील धोकादायक वळणावर ट्रक उलटला. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की मुंबईहून नागपूरकडे सुमारे वीस टन कापसाच्या गाठी घेऊन जात असलेला ट्रक क्रमांक एम एच 16 सीसी 7522 हा ट्रक सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करंजीघाट उतरत असताना घाटातील एका धोकादायक वळणाजवळ समोरून येणार्‍या वाहनाने या ट्रक चालकाला हूल दिल्याने हा कापसाने भरलेला ट्रक रस्त्यावरच उलटला असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com