श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील नेहरू भाजी मंडईचे नुतनीकरणाचे कामकाज आठ दिवसांत पूर्ण करा.

अन्यथा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिला आहे.

पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या हद्दीत नगरपरिषदेच्यामार्फत शहरातील नेहरू भाजी मंडईचे नुतनीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सदर मंडईमध्ये व्यवसाय करणारे भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांवर आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे.

यामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे आधीच व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. सध्या सर्वच व्यवसाय पूर्वपदावर येत असताना श्रीरामपुरातील भाजी विक्रेते मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.

मंडई नुतनीकरणाचे कामकाज धिम्यागतीने सुरू असल्यामुळे भाजी विक्रेत्यांवर दुकाने बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तरी सदरच्या भाजी मंडईच्या नुतनीकरणाचे काम येत्या आठ दिवसांत पूर्ण करून भाजी विक्रेत्यांना भाजी मंडईत व्यावसायाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, ज्येष्ठ नेते यादवबाबा लबडे, रामशेठ वलेशा, पक्षप्रतोद संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुजफ्फर शेख, मनोज लबडे, भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, मिराताई रोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ फंड, जिल्ही काँग्रेसचे सुभाष तोरणे, समीन बागवान, सुरेश शिंदे, लक्ष्मण कुमावत, रावसाहेब आल्हाट, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, सरताज इनामदार, सोमनाथ चौधरी, सनी मंडलिक, दिपक कदम, अविनाश काळे, सरबजितसिंग चुग आदींनी दिला आहे.