करण ससाणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पालिकेसमोर आंदोलन

पालिकेने स्मशानभूमी दुरुस्ती न करता काढली बोगस बिले
करण ससाणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पालिकेसमोर आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेच्या (Shrirampur Municipality) सत्ताधार्‍यांनी सत्तेत आल्यापासून कोणतेही काम न करता बोगस बिले (Fraud Bill) काढण्याचा सपाटा चालवला असून, सत्ताधारी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे (Alleged Deputy Mayor Karan Sasane) यांनी केला आहे. या गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेस कमिटी (Shrirampur City Congress Committee) व काँग्रेसच्या सर्व फ्रंटच्यावतीने नगरपालिकेसमोर करण ससाणे (Karan Sasane) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन (Movement) करण्यात आले.

सत्ताधार्‍यांनी अनेक कामांमध्ये गैरव्यवहार केलेला असून स्मशानभूमीसारखे ठिकाणही त्यांनी सोडलेले नाही. दि. 12 जुलै रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नमूद केल्याप्रमाणे बिलांचा गोषवारा माहे मे 2021 मधील बिलातील दि. 04 मे 2021 मे. रूपरतन मेटल कास्ट प्रा. लि. यांना स्मशानभूमी दुरुस्तीसाठी 1 लाख 47 ह जार 643 रुपये, दि.18 मे 21 भीमाशंकर एकनाथ परदेशी यांना नगरपालिका हद्दीतील हिंदू स्मशानभूमी येथे शवदाहिनी काँक्रिटीकरण करणे, अँगल व प्लास्टर करण्यासाठी 69 हजार 914 रुपये, तसेच दि.21 मे 2021 रूपरतन मेटल कास्ट प्रा. लि. यांना नगरपालिकेच्या केव्ही रोड येथील हिंदू स्मशानभूमीतील शवदाहिनी दुरुस्तीसाठी 28 हजार 984 रुपये मंजूर केलेले आहे.

म्हणजेच नगरपालिकेने स्मशानभूमी कामासाठी एकूण 2 लाख 46 हजार 541 रुपये मंजूर केले. परंतु प्रत्यक्षात पाहणी केली असता यापैकी कोणतेच काम झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे स्मशानभूमीच्या कामांमध्ये नगरपालिका सत्ताधारी व ठेकेदार यांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार केलेला असून सदर कामाची बोगस बिले कशी निघाली, या बोगस बिलांचा लाभार्थी कोण? कोणाच्या सांगण्यावरून ही बोगस बिले निघाली? अशी विचारणा करत उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर आंदोलन करून झालेल्या गैरव्यवहाराचा निषेध केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोद संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत लिपटे, निलेश भालेराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनप्रसंगी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन गैरव्यवहाराचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, मुजफ्फर शेख, शशांक रासकर, रितेश रोटे, सुहास परदेशी, आशिष धनवटे, युनूस पटेल, रावसाहेब आल्हाट, मिथुन शेळके, संतोष परदेशी, संजय साळवे, रियाज खान पठाण, युवराज फंड, सरबजीत सिंग चुग, जावेद शेख, बाबा वायदंडे, रितेश एडके, प्रवीण नवले, सुरेश दुबे, मनोज बागुल, बोर्डे, अमोल शेटे, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, संजय गोसावी, कृष्णा पुंड, अक्षय जावळे,अजय धाकतोडे, विशाल साळवे, वैभव कुर्‍हे, राहुल बागुल, प्रताप गुजर,मनोज यादव,गोपाळ भोसले, योगेश गायकवाड, सागर कुदळे,भागचंद धुळगंड, विशाल दुपाटी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com