संग्रहित फोटो करण ससाणे
संग्रहित फोटो करण ससाणे
सार्वमत

जिल्हा बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जास ऑगस्टअखेर मुदतवाढ- करण ससाणे

Arvind Arkhade

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेने सर्व प्रकारच्या कर्जास ऑगस्ट 2020 अखेर मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली आहे.

जिल्हा बँकेने यासंदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या मुदत कर्जाचे दि. 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या 6 महिन्यांच्या कालावधीत वसुलास पात्र वसुलीस स्थगिती देण्यात येत आहे.

या कालावधीत येणे बाकीवर व्याज आकारणी करून त्याची वसुली सप्टेंबर 2020 व लगतच्या 5 महिन्यांत करावयाची आहे. तसेच कर्ज परतफेड कालावधी 6 महिन्यांनी वाढवायचा आहे. सदरचे बदल हे सन 2019-20 हंगाम करिता मर्यादित राहतील.

याबाबत बँक पातळीवर सर्व प्रकारचे कर्ज, हप्त्यास दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासनाने घेतला असल्याचे ससाणे यांनी सांगितले आहे.

तसेच ज्या सभासदांचे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफी योजनेचे आधार प्रमाणिकरणाचे कामकाज चालू आहे. ज्या शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेले आहे व त्याची शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली आहे असे जमा खर्च पूर्ण करण्यात आलेले आहेत.

तथापी ज्या शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेले आहे; परंतु शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही. अशा शेतकर्‍यांना शासन येणे दर्शवून जमा खर्च करणेबाबत शासन निर्णयानुसार जिल्हा बँकेने परिपत्रक जारी करून निर्णय घेतला आहे.

बँकेने कर्ज वसुलीस ऑगस्ट अखेर मुदतवाढ दिल्याने शेतकरी, बँक सभासदांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार आहे. या निर्णयाबद्दल राज्य शासन, जिल्हा बँकेचे चेअरमन आणि सर्व पदाधिकार्‍यांचे ससाणे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com