करजगाव शाळेच्या शिक्षकांना रस्त्यात अडवून दमबाजी

करजगाव शाळेच्या शिक्षकांना रस्त्यात अडवून दमबाजी

करजगाव |वार्ताहर| Karajgav

नेवासा तालुक्यातील करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षकांना करजगाव-नेवासा रस्त्यावर अडवून अर्वाच्य भाषा वापरून दमबाजी केल्यामुळे शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दमबाजी करण्याचा हा प्रकार मंगळवारी शाळा सुटल्यानंतर शिक्षक नेवाशाला जात असताना सायंकाळी 5:30 दरम्यान घडला. विद्यालयातील शिक्षक दहिवले, बारगजे, दवणे हे घरी जात असताना त्यांना चौघांनी रस्त्यात अडवून लाठी - काठी घेऊन शिवीगाळ करत, दमबाजी केली. दहिवले सर कोण आहे, त्यांना मारायचे आहे असे या टोळक्यांनी म्हणत दहशत केली. मात्र ग्रामस्थांनी त्वरीत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

मात्र ही गोष्ट सकाळी करजगाव, पानेगाव, निंभारी, अंमळनेर, मांजरी येथील पालक व ग्रामस्थांना समजताच शाळेत एकच गर्दी झाली.

सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र थोरात यांनी शाळेत घेऊन पालक, ग्रामस्थ व शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी संबधितावर कडक कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच 23 डिसेंबर 2022 रोजी मुख्याध्यापक राम परदेशी यांना मांजरी ते पाथरे रोडवर एकाने अडवून अर्वाच्य भाषा वापरून दमबाजी करण्याचा प्रकार झाला होता. यापूर्वीही अशा अनेक घटना झाल्याने शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

क्रिडांगणावर टारगटांचा वावर

विद्यालयाच्या क्रिडांगणात टारगटांचा वावर वाढत आहे. शाळा भरतेवेळी, दुपारच्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर बाहेरील टुकार येरझरा घालत असतात. अनेकवेळा त्यांना शिक्षकांनी हटकले होते. याचाच राग येऊन शिक्षकांना दमबाजी झाल्याची घटना घडली असावी.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com