
करजगाव |वार्ताहर| Karajgav
दोन दिवसापासुन करजगाव व चिमटा फिडरवर सिंगलफेज ट्रान्सफार्मर नसल्यामुळे वीज बंद असल्यामुळे ग्रामस्थांनी वीज उपकेंद्रावर रात्री आठ वाजता ठिय्या मांडला. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे ग्रामस्थांनी वीज सोडण्याची मागणी केली.
यावेळी उपसरपंच अशोकराव टेमक, नवनाथ कंक, अ ण्णासाहेब कोळेकर, शिवाजी देवखिळे, पोपट मदने, संदिप पुंड, परसराम माकोणे, अमोल टेमक, ईश्वर गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, दीपक माकोणे, दीपक कंक, धनंजय पुराणे, शिवाजी पुराणे, कर्णासाहेब टेमक आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेवाशावरून वरीष्ठ अधिकारी, शेतकर्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपकेद्रातील कर्मचार्यांनी दिली. फिडरवर सिंगलफेज ट्रान्सफार्मर नसल्याभुळे वीज बंद करण्यात आली असून सिंगलफेज ट्रान्सफार्मर त्वरीत मागणी करून बसुन देऊ. तोपर्यत शेतकर्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नेवासा ग्रामीणचे सहायक अभियंता आकाश शेजुळे यांनी ग्रामस्थांना केले.