करजगावात प्रथमच ड्रोनद्वारे औषध फवारणी

करजगावात प्रथमच ड्रोनद्वारे औषध फवारणी

करजगाव |वार्ताहर| Karjgav

नेवासा तालुक्यातील करजगाव येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून सोयाबीन या पिकावर फवारणी करण्यात आली.

गावातील प्रगतिशील शेतकरी कैलास शिंदे यांच्या सात एकर सोयाबीन पिकावर त्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांनी अवलंबले पाहिजे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. याप्रसंगी दत्ता लोखंडे यांनी शेतकर्‍यांना ‘ड्रोनचे महत्व’ या फवारणीतून होणारे फायदे व इतर तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या.

अनेक शेतकर्‍यांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले. याप्रसंगी कृषी सहाय्यक राहुल पाटील, संजय शिंदे, सुभाष पुंड, नंदू देवखिळे, अशोक शिंदे, शरद तागड, विष्णू शिंदे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढ झालेल्या पिकांमध्ये हातपंपाने फवारणी करणे शक्य होत नसल्याने ड्रोन फवारणी करणे आवश्यक असून ती फायद्याची आहे. यामुळे शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचे कृषी सहायक राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले.ड्रोन फवारणी मशिन खुपच महाग असल्यामुळे शेतकर्‍यांना घेणे शक्य नाही. त्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com