करजगाव परिसरात गवतात हरवली पिके

करजगाव परिसरात गवतात हरवली पिके

करजगाव |वार्ताहर|Karjgav

पंधरा दिवसापासून होत असलेला रिमझीम पाऊस शेतकर्‍यांना दिलासा देणारा असला तरी शेतात पीकापेक्षा गवते तरतरली आहे.यामुळे सोयाबीन, कपाशी, मुग, उडिद यासारखी पीके गवतात हरवली आहे.

त्यातच एकाच वेळी खुरपणी आल्यामुळे वाढलेल्या रोजंदारीतही मजुर मिळणे अवघड झाले आहे. तसेच तणनाशक औषधांच्या किंमतीही भरमसाट वाढल्यामुळे फवारणी करणे ही अवघड होऊन बसले आहे.

नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगांव, शिरेगांव, खेडले-परमानंद, अंमळनेर, निंभारी, वाटापूर, गोमळवाडी परिसरात रोजच पडणार्‍या रिमझीम पावसामुळे शेतकरी वर्गात कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती झाली आहे. सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांत वाढलेले विविध प्रकारचे गवत तसेच चारा काढण्यासाठी होणारा त्रास, वाढलेली महागाई, मजुराची टंचाई यामुळे सध्या तरी शेतकर्‍यांची कभी खुशी कभी गम अशीच अवस्था पाहायवास मिळत आहे. मुळाकाठ परिसरात सोयाबिन व कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले गेले आहे. सततच्या पावसाने गवत वाढल्याने पिके झाकून गेली आहेत.

पावसामुळे विविध प्रकारच्या गवतांची वाढ झाली आहे. सोयाबीन साठी अंलग्रीप, कांद्यासाठी राऊंड, कपाशीसाठी टरगासुपर या तणनाशकाचा वापर करावा. ढगाळ हवामानामुळे विविध पिकावर रोग आढळून येत आहेत किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळत आहे. कपाशीसाठी मावा तुडतुडे नियंत्रणासाठी सोलोमोन व अंतरा कॉल याची फवारणी करावी. मका पिकावर लष्करी अळी आढळल्यास क्लोरोपायरीफॉस फवारणी करावी किंवा प्रमाण कमी असल्यास निंबोळी अर्क फवारणी करावी. कपाशीवर लाल्या आढळल्यास मॅग्नेशियम सल्फेट फवारणी करावी.

- डॉ. अशोकराव ढगे कृषी शास्त्रज्ञ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com