कर्जत : तालुक्यात खरिपाची 100 टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी

कर्जत : तालुक्यात खरिपाची 100 टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी

कर्जत : तालुक्यामध्ये 100 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी मशागत केली आहे. 49 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून क्षेत्रात आणखी वाढत असल्याचे दिसून आले. यावेळीच्या खरिपाचे वैशिष्ट्य असेल. उडीद आणि तूर या पिकांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कापूस आणि मका या पिकांचे क्षेत्र मात्र घटल्याचे दिसून येते. यावर्षी अवकाळी पाऊस चांगला पडला. पावसावर बळीराजाने खरीप पेरणी करून काळ्या आईची ओटी भरली.

तालुक्यात पेरणी करताना शेतकर्‍यांनी हमीभाव असलेल्या पिकांना प्राधान्य दिले आहे. कर्जत तालुका शासन दरबारी तसा रब्बी हंगामात गृहीत धरलेला आहे. मात्र कर्जत तालुक्यांतील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पावसाच्या भरोशावर खरीप पेरणी केली आहे. तालुक्यात आतापर्यन्त दरवर्षी असलेल्या उद्दिष्टाच्या 100 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

तालुक्यात दरवर्षी खरीप पेरणी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. कृषी क्षेत्रातील तालुक्यातील हा बदल आशादायी आहे. विशेष म्हणजे सरकारने विविध पिकांना हमीभाव जाहीर केल्यानंतर हा बदल होत असल्याचे दिसून येते पूर्वीच्या काळी रब्बी पिकांसाठी जमीन राखीव ठेवण्यात येत असे; परंतु आता तूर, उडीद, मूग यांना हमी भाव मिळत आहे. यामुळे हे पिकं मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहेत.

या पेरणीमुळे कृषिसेवा केंद्रातील बियाणे व खते औषधे यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. पेरणी करताना पूर्वी बैलांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत होता. मात्र आता शेतकर्‍यांची मानसिकता पूर्णपणे बदलल्याचे दिसून येते. पेरणी करताना वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी लहान ट्रॅक्टर किंवा यंत्रसामुग्री याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसून येते.

यामुळे कमी कालावधीत पेरण्या आटोपल्या. यावेळी कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी पेरणी करताना तूर, उडीद, मका या हमीभाव असलेल्या पिकांना प्राधान्य दिले आहे. यामध्ये मका पिकावर तर ती उगवताच आळीने आक्रमण केले आहे. यापासून कसा मार्ग काढायचा यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. पेरणी करताना शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी आंतरपिके घेण्याचा प्रयोग केला आहे.

उडीद, मका, तूर, बाजरी, भुईमूग, कपाशी, मूग, कांदा, ऊस, भाजीपाला, चारापिके, मटकी आदी पिकांना प्राधान्य दिले आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील विविध भागात फळबागा करण्यास शेतकर्‍यांनी पसंती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने लिंबू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, केळी, द्राक्ष, आंबा यांच्या बागांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे.

कर्जत - 92 मिलीमीटर, माहीजळगाव - 92 मि. मी., कोंभळी - 92 मि. मी., राशीन - 92 मि. मी., भांबोरा 92 मि. मी., मिरजगाव - 92 मि. मी. केले.

पीक विम्याची मुदत 31 जुलै करण्यात आली असून जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी यावर्षी पाऊस जरी चांगला असला तरी आपल्या सर्व पिकांचा विमा उतरवावा. कारण पीक विमा उतरविल्यामुळे आपल्या पिकांना संरक्षण प्राप्त होते आणि काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याची नुकसान भरपाई मिळते यामुळे शेतकर्‍यांनी हमखास पीक विमा उतरवावा.

दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com