दोघांवरील हल्ल्यानंतर व्यापारी आक्रमक

कापड बाजारातील सभेत संताप व्यक्त || अतिक्रमणाचाही विषय पुन्हा ऐरणीवर
दोघांवरील हल्ल्यानंतर व्यापारी आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील कापड बाजारातील (Kapad Bazar) दोन व्यापार्‍यांवर काल चाकूने प्राणघातक हल्ला (Merchants Attack) करण्यात आला. त्यामुळे व्यापारी संतापले असून त्यांनी आक्रमक (Aggressive) भूमिका घेत आज बाजारपेठ बंद ठेवली. या वेळी झालेल्या सभेत कापड बाजारात मोठी गर्दी झाली होती. या वेळी आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) हेही उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) केला असून, दोघांना अटक केली आहे.

दोघांवरील हल्ल्यानंतर व्यापारी आक्रमक
उपजिल्हाधिकार्‍यांपाठोपाठ तहसीलदारांच्याही बदल्या

हल्ल्याच्या (Attack) निषेधासाठी आज कापड बाजारात जमलेल्या व्यापार्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हल्लेखोरांमागे नेमकी कोणाची ताकद आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. ही उपद्रवी कीड केवळ कापड बाजारालाच (Kapad Bazar) नाही तर एमआयडीसीलाही (MIDC) लागली आहे. व्यापार्‍यांना निडरपणे व्यवसाय करण्यासाठी पोलिसांनी (Police) ल्लेखोर व अतिक्रमण करणार्‍या प्रवृत्तीचा बिमोड करायला हवा, अशी मागणी व्यापार्‍यांनी या वेळी केली. व्यापार्‍यांनी बंद पाळल्याने सर्जेपुरा, कापड बाजार, घासगल्ली, नवीपेठ आदी पसिरात शुकशुकाट होता.

दोघांवरील हल्ल्यानंतर व्यापारी आक्रमक
सावळविहीर येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 75 एकर जागा

काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असतानाच सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमाराला घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. दोन्ही जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोघांवरील हल्ल्यानंतर व्यापारी आक्रमक
नगरचे शेतकरी पेरणार बिकानेरची मटकी

या प्रकरणी अम्मार हमीद शेख, रिजवान अमीन सय्यद (दोघेही राहणार पाचलिंब गल्ली, कापडबाजार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हमजा शौकतअली शेख (मोचीगल्ली) व त्याचा भाऊ (नाव माहीत नाही) हे दोघे पसार आहेत.

व्यापार्‍यावर झालेल्या हल्ल्यानंतर (Merchants Attack) हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व व्यापार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. व्यापारी दीपक नवलानी व प्रनिल बोगावत अशी जखमींची नावे आहेत. नवलानी यांच्या पोटावर व छातीवर चाकूने चार वार करण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी हल्लेखोर व व्यावसायिक यांच्यात किरकोळ वाद (Dispute) झाले होते. त्यानंतर ते मिटविण्यात आले होते. सायंकाळी अचानक त्याने दुकानात घुसून वाद घालण्यास सुरूवात केली व नवलानी यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या बोगावत हेही यात जखमी झाले आहेत. नवलानी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व व्यापार्‍यांनी आक्रमक (Aggressive) होत घोषणाबाजी केली. ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी घटनास्थळी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर सर्व व्यापारी व कार्यकर्ते बाजारपेठेतून पायी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तेथे मोठा जमाव जमला होता. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर आ. संग्राम जगताप, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन कार्यकर्ते व व्यापार्‍यांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले होते.

हल्लेखोरांमागील शक्तीचा शोध घ्या

व्यापार्‍यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी राजकीय हस्तक्षेपास पोलिसांनी अजिबात थारा देऊ नये. हल्लेखोरांमागे कोण आहे, याची चौकशी करावी. व्यापार्‍यांनी कुठलीही भीती बाळगू नये. त्यांच्या पाठीशी आम्ही कायम राहू. बाजारातील अतिक्रमणाचा विषय पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी मार्गी लावावा, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी या वेळी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com