सुरा घेऊन तरूणाची माळीवाड्यात दहशत

पोलिसांच्या कामात अडथळा || गुन्हा दाखल
सुरा घेऊन तरूणाची माळीवाड्यात दहशत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मध्यरात्रीच्या सुमारास माळीवाडा बस स्थानक (Maliwada Bus Stand) परिसरात धारधार सुरा (Kanife) घेऊन दहशत (Terror) निर्माण करणार्‍या तरूणाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत बोरूडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

सुरा घेऊन तरूणाची माळीवाड्यात दहशत
द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर; 6 कोटींचा निधी, उत्पादकांना लाभ होणार

जैद जाकीर शेख (वय 28 रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी) असे गुन्हा दाखल (Filed a Case) झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला अटक (Arrested) केली आहे. सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे यांचे पथक हद्दीत गस्त घालीत असताना त्यांना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास माळीवाडा बस स्थानक (Maliwada Bus Stand) परिसरात गर्दी दिसली. त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली असता शेख हा हातामध्ये धारधार सुरा घेऊन परिसरात दहशत निर्माण करीत होता.

सुरा घेऊन तरूणाची माळीवाड्यात दहशत
कर्ज फेडण्यासाठी मित्रांनीच दिली लुटीची सुपारी

त्याला पकडत असताना त्याने पोलिसांना विरोध करून कामात अडथळा निर्माण केला. उपनिरीक्षक दुर्गे यांनी पोलीस ठाण्यातून अधिक अंमलदारांना बोलून घेतले. ते आल्यानंतर पोलिसांनी शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरा हस्तगत केला आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक (Arrested) केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे अधिक तपास करीत आहेत.

सुरा घेऊन तरूणाची माळीवाड्यात दहशत
बिल मागितल्या कारणाने हॉटेल चालक व कामगारांना बेदम मारहाण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com