महिला काँग्रेसच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी कमलताई साळवे

महिला काँग्रेसच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी कमलताई साळवे

राहुरी (तालुका प्रतिनिधी) / rahuri - राहुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी कमलताई अरूण साळवे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस अनुराधाताई नागवडे यांनी साळवे यांना निवडीचे पत्र दिले.

कमलताई साळवे म्हणाल्या, माझ्यासारख्या सर्व सामान्य महिलेला राहुरी तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष केले. हा विचार फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात काँग्रेसची महिला संघटना उभी करीन व या संघटनेच्या माध्यमातून महिलांचे व सर्वसामान्य गोरगरीबांचे प्रश्र प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, राहुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव, संजय भोसले, बबनराव ढोकणे, बाळासाहेब चव्हाण, पढंरीनाथ पवार, संजय पोटे, शशिकांत गाडे, अजित तायडे, कैलाश पठारे, रावसाहेब गडाख, एकनाथ दुशिंग, विकास तारडे, महेश तनपुरे, संतोष येवले, सुभाष निशाणे, भारत पंडित, अनुसंगम शिदे, रखमाभाऊ क्षीरसागर, सुरेश शिरसाट, गोरक्ष ढोकणे, संजय विधाटे, पोपटराव जाधव, बाबा साठे, मनिषा मोरे, रोहिणी भोसले, शारदा साळवे, लता साळवे, रेखा साळवे, ज्योती साळवे, संगीता शिंदे, शोभा साळवे, लीला साळवे, प्रमिला कसबे, सुशिला साळवे, मारिया साळवे, सारिका साळवे, स्वाती साळवे, राहुल जाधव उपस्थित होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com