कळसुबाई शिखरावर गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

कळसुबाई शिखरावर गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

अकोले |प्रतिनिधी| Akole

घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी कळसुबाई शिखरावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले.

तसेच पूर्वसंध्येला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून शिखरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

दरवर्षी प्रमाणे कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी कळसुबाई शिखरावर पहाटेच चढाई करून सूर्योदय वेळी कळसुबाई मातेचा अभिषेक व आरती करून गुढीचे पूजन केले व राज्यातील सर्वोच्च शिखरावर मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

या वेळी करोना नावाच्या राक्षसाचा वध करून मानवाला ह्या महामारीतून मुक्त करून सर्वाना हिंदू नूतन वर्ष सुखाचे ,आनंदाचे,आरोग्यदायी जाऊ दे अशी कळसूबाई मातेला गिर्यारोहकांनी साकडे घातले. गिर्यारोहकांनी मास्क घालून, सामाजिक अंतर ठेवून, सॅनिटायझरचा वापर करून शासनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न केला.

या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, मनसे उपजिल्हा अध्यक्ष आत्माराम मते, बाळू आरोटे, निलेश पवार, अशोक हेमके,काळू भोर,प्रवीण भटाटे, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत,संकेत वाडेकर, पुरुषोत्तम बोराडे,ज्ञानेश्वर मांडे ,देविदास पाखरे,संदीप परदेशी ,कृष्णा बोराडे, पुष्कर पवार आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com