कळसुबाई मातेच्या घटकलशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पूजन

कळसुबाई मातेच्या घटकलशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पूजन

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखरावर अखंडितपणे गेल्या 25 वर्षांपासून घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाकडून नवरात्रोत्सवात घटस्थापना करून रोज विधिवत पूजन करून कळसूबाईमातेची आरती केली जाते. तसेच शिखरावर मंदिराच्या परिसरात साफसफाई केली जाते. याच कार्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद माजी सदस्य गोरख बोडके यांनी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला घटकलशाचे पूजन करून मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्याकडे घटकलश सुपूर्द केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंडळाच्या रौप्यमहोत्सव वर्षाच्या शुभेच्छा देऊन गिर्यारोहकांच्या कार्याचे कौतुक केले. आज घटस्थापनेच्या दिवशी मंडळाच्या गिर्यारोहकांनी कळसूबाई मंदिराला फुलांच्या माळांनी सजावट करून वाजत गाजत घटकलशाचे पूजन व कळसूबाई मातेची आरती करून मोठ्या उत्साहात शिखरावर घटस्थापना केली.

करोना नावाच्या राक्षसाचा समूळ नाश मातेने करावा असे साकडे मातेचरणी गिर्यारोहकांनी केले. यावेळी करोना संबंधित सर्व नियम पाळण्यात आले. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळासाहेब आरोटे, निलेश आंबेकर, प्रवीण भटाटे, काळू भोर, ज्ञानेश्वर मांडे, विकास जाधव, बाळासाहेब वाजे, निलेश पवार, पंढरीनाथ दुर्गुडे, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, आदेश भगत इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.