कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना बंदी

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना बंदी

अकोले |प्रतिनिधी| Akole

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्य (Kalsubai - Harishchandragad Sanctuary) क्षेत्रात पर्यटकांना पर्यटनास बंदी (Tourists Banned from Tourism) घालण्याचा निर्णय आज मंगळवारी भंडारदरा (Bhandardara) येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी (Colletor), वनसंरक्षक व वन्यजीव विभाग नाशिक (Forest Conservator and Wildlife Department, Nashik) यांच्या कोविड-19 चा (Covid 19) प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनस्थळात बंदीबाबत अलीकडेच आदेश प्राप्त झाले होते.

या पार्श्वभूमीवर भंडारदरा (Bhandardara) व क्षेत्रातील सर्व गावांचे सरपंच,समिती अध्यक्ष, टेन्ट धारक यांची covid-19 च्या प्रतिबंधात्मक उपयोजना बाबत शासन आदेशाची अंबलबजावणी करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती .

या सभेत कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्य (Kalsubai - Harishchandragad Sanctuary) क्षेत्रातील सर्व गावातील सरपंच, अध्यक्ष यांनी पर्यटकांना बंदी घालण्या संदर्भात एकमुखी सहमती दर्शविली. तसेच कोणताही पर्यटक अभयारण्य क्षेत्रात फिरताना दिसल्यास संबंधित गावची ग्राम वनव्यवस्थापन समिती दंडात्मक कारवाई करेल असाही निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कळसूबाई-हरिश्चंद्रगड (Kalsubai - Harishchandragad) गाभाऱ्यातील पर्यटन शासनाचे पुढील आदेशप्राप्त होई पर्यंत बंद असणार आहे .पर्यटकांनी तपासणी नाक्यावर प्रवास करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव आणू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारानाशिक विभागाचे वन संरक्षक कशीकर यांनी दिला आहे.

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या सभेस वनपाल मुठे, वनपाल ,वनरक्षक, पाटील, सरपंच ,रतनवाडी सरपंच, कोलटेंभेचे सरपंच ,घाटघर सरपंच, मुरशेत सरपंच, उडदावणे अध्यक्ष होते .यावेळी टेन्ट धारक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com