
अकोले |प्रतिनिधी| Akole
वन्यजीव नाशिक कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये (Kalsubai Harishchandragad Sanctuary) वनपरिक्षेत्र भंडारदरा (Bhandardara) यांच्या सौजन्याने 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा (Celebrate Wildlife Week) करण्यात आला. या सप्ताहाचे औचित्य साधत नुकतीच नाशिक ते आशिया खंडातील (Asia Continent) सर्वात खोल दरी असलेल्या साम्रद दरीपर्यंत सायकल रॅलीचे (cycle Rally) आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचा (cycle Rally) प्रमुख उद्देश वन्यजिवांचे सरंक्षण करण्याचा संदेश सामान्य माणसापर्यंत पोहचविणे हा होता.
दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यानचा कालावधी जागतिक वन्यजीव सप्ताह (World Wildlife Week) म्हणून पाळला जातो. कळसूबाई (Kalsubai), हरिश्चंद्रगड अभयारण्य (Harishchandragad Sanctuary) नाशिक (Nashik) या अभयारण्य असणार्या वनपरिक्षेत्र भंडारदरा (Bhandardara) यांच्यावतीने हा सप्ताह साजरा केला जातो. 3 ऑक्टोबर रोजी नाशिक ते साम्रद-सांदन दरी अशी 108 कि. मी ची सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या सायकल रॅलीमध्ये नाशिक (Nashik) येथील नामवंत 30 सायकलपटू तर वन्यजीव विभागाच्या 10 कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला होता. प्रत्येक सायकलवर वन्यजीव सप्ताहाचा लोगो व वन्यजीव वाचविण्यासंदर्भातील नामफलक लावलेले होते. या रॅलीचे भंडारदरा (शेंडी) येथील वनविभागाच्या (Forest Department) टोलनाक्यावर नाशिक विभागाचे वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, दत्ता पडवळे यांच्यासह त्यांच्या कर्मचारी वर्गाने जोरदार स्वागत केले.
या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने नाशिक येथील वन्यजीव मित्र महाले यांनी कळसूबाई अभयारण्यात प्रामुख्याने आढळणार्या बिबट्या या हिंस्र प्राण्यापासून कसे संरक्षण करावे याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तर संगमनेर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधत शेंडीच्या पंचशिल चौकात वन्यजीवांचे रक्षण कसे करावे, वन्यजीवांपासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या समारोपाप्रसंगी शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे यांनी वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचे आपण रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले.
यावेळी शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे, वनपाल रवींद्र सोनार, सचिन धिंदळे, भास्कर मुठे, संजय गिते, गुलाब दिवे, महेंद्र पाटील, चंद्रकात तळपाडे, मनीषा सरोदे यांच्यासह वनविभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.