कडीत-फत्याबाद परिसराला वादळी पावसाने झोडपले

कडीत-फत्याबाद परिसराला वादळी पावसाने झोडपले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील कडीत खुर्द, फत्याबाद, मांडवे व कुरणपूर या परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी 8 वा. विजेच्या कडकडाट तसेच वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने झोडपले. जवळपास 4 तास हा पाऊस झाला.

वादळाने कोल्हार ते बेलापूर रोडवर कडित बुद्रूक येथे अशोक वडितके यांच्या घराजवळ रस्ताच्या कडेला मोठे बाभळीचे झाड पडले. त्यामुळे जवळपास 1 तास वाहतूक ठप्प होती. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पावसाने फत्याबाद गावात पाणीच पाणी झाले. अचानक झालेल्या धो-धो पावसाने शेतकर्‍यांची कपाशी, सोयाबीन, मका यासारखी पीके पाण्यात बुडाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. पिकांचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com