झेडपी कात्रीत कृषी विभागीची कडबाकुट्टी

गत वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याने तरतूद घटवली
झेडपी कात्रीत कृषी विभागीची कडबाकुट्टी
झेडपी

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्या (Ahmednagar ZP) कृषी विभागा मार्फत शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या कडबाकुट्टी योजनेला (Kadaba kutti anudan yojana) प्रशासनाने कात्री लावली आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा कडबाकुट्टीच्या तरतुदीत निम्म्याने कात्री लावण्यात आली असल्याने शेतकर्‍यांची आता झेडपीच्या कडबाकुट्टीसाठी धावधाव करावी लागणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेवर प्रशासक राज असल्याने शेतकर्‍यांनी कडबाकुट्टीसाठी कोणाकडे वशिला लावायाचा हा प्रश्न आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांपैकी कडबाकुट्टी योजना फारच लोकप्रिय आहे. दरवर्षी सदस्यांमध्ये या योजनेवरून ताणाताणी होत असत. माझ्या गटात जास्तीजास्त कडबाकुट्टी मिळाव्यात यासाठी सदस्यामध्ये वाद झालेले जिल्हा परिषदेने पाहिलेले आहे. मात्र, यंदा 52 लाख तरतुदीवरून कडबाकुट्टी योजनेसाठी केवळ 25 लाखांची तरतूद केल्याने प्रत्येक तालुक्याच्या वाट्याला 15 ते 20 कडबाकुट्टी येणार आहे. तर दुसरीकडे गत वर्षी प्रत्येक झेडपी गटात यापेक्षा जास्त संख्या होती.

कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या कडबाकुट्टी योजनेत जिल्हा परिषदेकडून सदस्यांना 9 हजारांचे अनुदान देण्यात येते. बाजारात एका कडबाकुट्टी यंत्राची किंमत 18 ते 25 हजार आहे. त्यात जिल्हा परिषदेकडून निम्मेच अनुदान देण्यात येत असतांना शेतकर्‍यांची कडबाकुट्टीसाठी मोठी मागणी असतांना यंदा या योजनेची तरतूद निम्म्यावर आणण्यात आल्याने शेतकर्‍यांची कुट्टीसाठी धमछाक होणार असल्याचे निश्चित आहे.

दरम्यान, कृषी विभागाशी याबाबत संपर्क केला असता जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला अवघे 57 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी कडबाकुट्टी योजनेला मोठी मागणी असल्याने विभागाला मिळालेल्या एकूण 57 लाखांच्या तरतूदीपैकी 25 लाख रुपये कडबाकुट्टीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com