DY Chandrachud : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड साईचरणी नतमस्तक

DY Chandrachud : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड साईचरणी नतमस्तक

शिर्डी | प्रतिनिधी

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सरन्‍यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी (१६ सप्टेंबर) शिर्डीत येवून साईबाबांच्‍या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांना भगव्या रंगाची शाल अर्पण केली. तसेच त्यांनी साईबाबांच्या पादुकांची पूजा केली व आरती केली.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे शनिवारी संध्याकाळी शिर्डीत आले. साईबाबांच्‍या दर्शनानंतर साई संस्थानचं अध्‍यक्ष तथा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि साई संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी चंद्रचूड यांचा शाल आणि साईची मूर्ती देवून सन्मान केला. यावेळी सेक्रेटरी जनरल अतुल कुहेकर, रजिस्‍ट्रार सर्वोच्‍च न्‍यायालय राकेश कुमार, जनरल रजिस्‍ट्रार मुंबई उच्‍च न्‍यायालय अनुजा अरोरा आदी उपस्थित होते.

साईंच्या दर्शनानंतर डी. वाय. चंद्रचूड यांनी साईबाबा संस्थानच्या अभिप्राय बुकात आपलं मत लिहिलं. 'मी शिर्डीत आलो आणि बाबांच्या पायांचे दर्शन घेतले मला दैवी आशीर्वाद मिळाले, बाबांनी या विश्वाला शांततेचा जो संदेश दिलेला आहे. तो सर्व मानव जातीसाठी एका दीपस्तंभ सारखा आहे. माझ्या आयुष्यात मला प्रत्येक दिवशी बाबांच्या आशीर्वादाची आणि दिव्यत्वाची प्रचिती येते तसेच बाबांचे अस्तित्व जाणवते', असं त्यांनी नमूद केलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com