पावसाचा तडाखा, 53 हजार शेती बाधीत

सरकारी आकडेवारीत 22 कोटींची नुकसान
पावसाचा तडाखा, 53 हजार शेती बाधीत

अहमदनगर |ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार, अतिवृष्टी आणि चक्री वादळाचा चांगलाच दणका जिल्ह्यातील शेती आणि शेतकर्‍यांसोबत नागरिकांना बसला आहे. यात 53 हजार 115 हेक्टरवरील शेती बाधीत झाली असून 61 हजार 635 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे 1 हजार 36 घरांची पडझड तर 403 पूशधनाची हानी झालेली आहे. यासह 1 हजार 807 भांडे व घरगुती वस्तूंचे नुकसान झालेले असून 7 हजार 862 ठिकाणी विहीर, दुकाने अथवा जनावरे वाहून गेलेली आहेत. यासह 369 हेक्टरवरील शेती खरडून वाहून गेलेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या सर्वांचा पंचनामा करून शासनाकडे 22 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 141 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला असून धरणे, नदी, नाले, विहीरी तुडूंभ भरलेल्या असून सध्या उभ्या पिकात पाणी साठलेले आहे. यामुळे शेतकर्‍यांची अवस्था विचित्र झालेली आहे. जून महिन्यांपासून जिल्ह्यात ही परिस्थिती हळूहळू निर्माण झाली. जुलै महिन्यांत पावसाने ताण दिल्याने दक्षिण जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके सुकून गेली. मात्र, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात पावसाने चांगलाच तडाख दिला आहे. विशेष करून नगर, जामखेड, कोपरगाव, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यात याचे प्रमाण अधिक आहे.

जून महिन्यांत जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 87.23 क्षेत्र बाधीत झाले होते. यामुळे 359 शेतकर्‍यांचे नुकसान झाले. यात 7 लाख 32 हजारांचे नुकसान झाले. तर 137 घरांची पडझड झाली आणि 31 पशूधनाला फटका बसला. जुन महिन्यांत 12 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. यासह 33 शेतकर्‍यांची 9.6 हेक्टरवरील संपूर्ण शेत जमीन वाहून गेली. जुलै महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी असले तरी 65 घरांची पडझड होवून 19 पूश हानी झाली. यात 7 लाख 92 हजारांचे नुकसान झाले.

ऑगस्ट महिन्यांत 14 हजार 92 हेक्टरवरील पिकांचे नुकसान होवून यात 20 हजार 766 शेतकर्‍यांना फटका बसला. यात 10 कोटी 73 लाख 95 हजारांचे नुकसान झाले. तसेच 557 घरांची पडझड होवून 265 पशूधनाची हानी झाली. यासह 1 हजार 769 भांडे आणि घरगुती साहित्याची हानी झाली. तसेच विहीर, दुकाने आणि जनावरे वाहून गेलेल्यांची संख्या 6 हजार 214 असून यात 2 कोटी 77 लाख 68 हजारांचे नुकसान झाले. तसेच 297 हेक्टर शेतीपूर्णपणे वाहून गेलेली आहे.

1 ते 15 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात 14 हजार 921 शेतकर्‍यांचे 9 हजार 748 शेतीला फटका बसला. यात 7 कोटी 33 लाखांचे नुकसान झाले. तसेच 190 घरांची पडझड झालेली असून 87 पशूधनाची हानी झाली असून 38 ठिकाणी संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. तसेच विहीर, दुकान आणि पशूधन वाहून जाण्याचे 1 हजार 609 घटना घडलेल्या आहेत. यात 16 लाख 54 हजारांचे नुकसान झालेले आहे. तर 217 शेतकर्‍यांची 63 हेक्टर जमीन वाहून गेलेली आहे. 26 ते 29 सप्टेंबर या दरम्यान गुलाब चक्रीवादळामुळे 25 हजार 589 शेतकर्‍यांचे 29 हजार 187 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीची आकडेवारी प्रलंबित असून 87 घरांची पडझड, 1 पशूधनाचे नुकसान 39 ठिकाणी विहीर, दुकान अथवा पशूधन वाहून गेलेले आहे.

अशा प्रकारे जिल्ह्यात 53 हजार 115 हेक्टरवरील शेती बाधीत झाली असून 61 हजार 635 शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे 1 हजार 36 घरांची पडझड तर 403 पूशधनाची हानी झालेली आहे. यासह 1 हजार 807 भांडे व घरगुती वस्तूंचे नुकसान झालेले असून 369 हेक्टरवरील शेती खरडून वाहून गेलेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या सर्वांचा पंचनामा करून शासनाकडे 22 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे.

गुलाबी चक्रीवादळ येण्यापूर्वी जिल्ह्यात 163 गावातील 36 हजार 46 शेतकर्‍यांना मुसळधार आणि अतिवृष्टीचा फटका बसला होता. यात 21 हजार 268 हेक्टरवरील जिरात पिकांना, 2 हजार 451 हेक्टरवरील बागायत पिकांना तर 208 हेक्टर फळबागांचा समावेश होता. यासाठी 18 कोटी 14 लाख रुपयांचे आवश्यकता आहे. त्यानंतर तीन दिवसात चक्रीवादळामुळे 29 हजार 187 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. हे सर्व क्षेत्र हे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असून त्यापेक्षा कमी नुकसान असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या आणि शेतीचे क्षेत्र हे कितीतरी पट अधिक असणार आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आणि शेती जून ते सप्टेंबर झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात उध्दवस्त झालेला असून शासन अद्याप माहिती घेत आहे. कोणत्याही शेतकर्‍यांना अद्याप शासनाकडून भरपाई मिळाले नसून शेवगाव-पाथर्डीतील पूरग्रस्त शेतकरी तर आठवड्यातून चार वेळा आंदोलन करून देखील मायबाप सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.