
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शिवाजीरोड, नामदेव मंदिराजवळ राहत असलेल्या महिला न्यायाधीश यांच्या घराच्या भिंतीला लावलेली सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरातील शिवाजीरोडवरील नामदेव मंदिर पसिरात राहणार्या श्रीरामपूर न्यायालयातील सह. दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीरामपूर प्रियंका अ. पटेल यांची 5 हजार रुपये किंमतीची पोपटी व काळ्या रंगाची हिरो स्पीरीट कंपनीची सायकल त्यांच्या घराच्या आवारात आतील बाजुस भिंतीला लावलेली सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 68/2022 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. खेडकर करत आहेत.