जोगेश्वरी सोसायटीला जिल्हा बँकेमार्फत सहकार्य करू

सभापती अरुण तनपुरेंची ग्वाही
जोगेश्वरी सोसायटीला जिल्हा बँकेमार्फत सहकार्य करू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सहकाराच्या राजकारणात निवडणुकीपुरते राजकारण करा. इतरवेळी संस्था, सभासदांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करा. जिल्हा सहकारी बँकेमार्फत जे सहकार्य लागेल, त्यासाठी आपण कधीही आपल्या पाठीमागे उभे राहू, अशी ग्वाही जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी दिली.

राहुरीच्या जोगेश्वरी सोसायटीच्या जनसेवा मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांचा तनपुरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जनसेवेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून मोठा विजय संपादन केल्याबद्दल कार्यकर्ते मतदार व विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. जनसेवा मंडळाचे प्रमुख कारखान्याचे संचालक विजयराव डौले यांनी जनसेवेच्या सर्व नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानताना ज्येष्ठनेते अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील सर्व निवडणुकांची वाटचाल असेल, अशी ग्वाही दिली.

माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी यांनी जनसेवा मंडळाच्या नेत्यांसह सभासदांच्या सहकार्यातून सोसायटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व संचालक एकदिलाने प्रयत्न करतील, सभासदांनी टाकलेल्या विश्वासास तडा जाऊ दिला जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नूतन संचालक प्रशांत डौले, सचिन हारदे, संजय येवले, पांडुरंग भुजाडी, बाबुराव काळे, संदीप भोंगळ, भगवान राजगुरू, डॉ. रखमाजी घाडगे, दत्तात्रय तागड, सदाशिव गुंजाळ आदींसह मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव हारदे, मारुतराव हारदे, दीपक तनपुरे, रावूकाका तनपुरे, अंबादास काळे यांच्यासह सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com