'या' तालुक्यात झाली सव्वालाख रुपयांच्या कापसाची चोरी

'या' तालुक्यात झाली सव्वालाख रुपयांच्या कापसाची चोरी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) जोगेश्वरी आखाडा (Jogeshwari Akhada) येथील कापूस खरेदी केंद्रात (Cotton Shopping Center) साठविलेला एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा 15 क्विंटल कापूस (Cotton) अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून व कुलूप तोडून चोरून नेला. ही घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) अनिल ज्ञानदेव डौले यांनी राहुरी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

डौले यांचे नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) जोगेश्वरी आखाडा येथे कापूस खरेदी केंद्र आहे. दि. 21 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले तेव्हा दुकानात 64 क्विंटल कापूस होता. नेहमीप्रमाणे रात्री अडीच वाजेच्या सुमारास डौले हे दुकानात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाच्या बाहेर कापूस (Cotton) पडलेला आढळून आला. दुकानाचे शटर अर्धवट उघडे होते व दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com